कामाची प्रतवारी माणसानी त्याला त्या कामाच्या वाटणाऱ्या उपयोगीतेवर केलीये.

डॉक्टर हा समाजातला (शास्त्रज्ञ तसा फारसा मधेमध्ये येत नाही) सर्वोच्च्य व्यवसात मानला गेलायं कारण शरीर टिकवणं आणि वेदनामुक्ती ही माणसाची प्रार्थमिक समस्या आहे. वास्तविकात जर कुणालाही कोणत्याही कामात रस असेल तर फक्त तीन  वेळा ते काम केल्यावर तो त्या कामात निष्णात होऊ शकतो मग त्याच्याकडे डिग्री असो की नसो.

नैपुण्य हे रस आणि सराव या दोन गोष्टींवर अवलंबून आहे मग ते काम खेळ असो, अभिनय असो, वैद्यक असो, संगीत असो की आणखी काही त्यानी काहीही फरक पडत नाही.

सध्या अभिनयाला आलेलं महत्त्व एंटरटेनमेंट ही समाजाची प्रमुख गरज असल्यानी आलंय.

परदेशात सर्व व्यक्ती समान मानल्या जातात (म्हणजे पंतप्रधान सुद्धा त्याच्या कार्यक्षेत्रा व्यतीरिक्त स्वतःला सामान्य नागरिकच समजतो) त्यामुळे प्रत्येक कामाला सारखं महत्त्व दिलं जातं, आपल्याकडे कामाची प्रतवारी केल्यामुळे वर्णसंस्था निर्माण झाली आणि त्याचे हे परिणाम आहेत.

संजय