खरं आहे. मुलांशी संवाद साधत राहाणे हा एक उपाय सर्व साधारणपणे सुचवला जातो, पण अशी चिडवाचिडवी होत असते तेव्हा मुलं आपल्या कोषात अधिकाअधिक जातात आणि आपण फार प्रश्न विचारले की बोलायचीच बंद होतात त्या विषयावर. मला वाटतं प्रत्येकाला आपलं मुल ठाऊक असतं त्या त्या प्रमाणे मार्ग  अवंलंबिणे हाच एक उपाय आहे. त्यांच्या विश्वात काय चालू आहे ते गोड बोलूनच समजून घ्यावे  लागते एवढं खरं