उच्चनीचतेच्या कल्पनेत हे रुजलेले आहे. सरकारी अधिकाऱ्यात ज्याला जास्त सुरक्षा असते तो त्यांच्या वर्तुळात जास्त भाव मारून असतो. आपल्याकडे राजकीय पुढारी आणि चित्रतारे व तारकांना विनासायास भरपूर प्रतिष्ठा मिळते. अगदी देशद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल तुरुंगवास भोगलेल्या ताऱ्यांना देखील भरपूर मानसन्मान मिळतो. भ्रष्टाचारी नेते वा अधिकारी यांना त्यांच्या श्रीमंतीच्या प्रमाणात मानसन्मान मिळतो.
उद्योजकांत देखील हिरे उद्योग, दागिने उद्योग, अर्थसहाय्य, माहिती उद्योग, सल्लागार कंपन्या इ. उद्योगांना उच्च दर्जा आहे. वस्तू उत्पादन, हॉटेलिंग, सेवा उद्योग इ. ना तेवढा दर्जा नाही.
श्रमिक काम करणारांना कमीत कमी मान वा दर्जा मिळतो. एखाद्या कंपनीचा अधिकारी बँकेत गेला तर व्यवस्थापक स्वतः उठून त्याचे स्वागत करतो व बसा म्हणून सांगतो. पण कामगार वा शिपाई गेला तर त्याला बसा म्हणून सांगत नाही.
समाजाची ही मानसिकता बदलणे कठीण आहे.