खूप दिवसांनी मनोगतावर चक्कर मारली आणि हे शीर्षक दिसले. सुंदर लेख...मस्त आठवणी...
आम्हीही लहानपणी खूप उन्हाळाकाम करायचो. कुरडया, वेगवेगळ्या पापड्या, शेवया, पापड... पाटावरच्या शेवया गाळायला(खाली सूपावर वाळत घालायला) नंबर लागत असे. मध्येच ब्रेक घेऊन सरबत वगैरे... गल्लीतील सगळे ठरवून चालायचे... खूप मजा यायची. आठवणींना उजाळा मिळाला... धन्यवाद रोहिणी... तुझ्या उन्हाळकामाला शुभेच्छा...