मोहनाजे तुम्हाला धन्यवाद. या दुव्यावर मी बघून घेईन काय ते. हा रायन कोणत्या देशात शिकत होता (किंवा आहे) हे समजत नाही. पण एकूण हा प्रश्न फारच गंभीर आहे यात वादच नाही. आपल्यासारखी कुटुंब व्यवस्था परदेशात नाही. आजच्या पिढीला आपली कुटुंब व्यवस्था कितीही  जुनाट वाटत असली तरी त्याचे अनेक फायदे आहेत. आता आपल्याकडेही जरी विभक्त कुटुंबद्धत आली असली तरी अजूनही लहान मुलांना आई-वडिलांजवळ झोपायची सवय असते. झोपवताना आई मुलांशी बोलते. त्यांना जवळ घेऊन, गोंजारून, कधी गोष्ट सांगून झोपवते. याचा कुठेतरी मुलांवर सकारात्मक परिणाम होतोच. या मुलांना जी मानसिक सुरक्षितता हवी असते ती आपोआप मिळते. पण परदेशात ( आणि आता आपल्याकडेही काही उच्च्वर्गात) १ वर्षापासून मुलाला आयाजवळ झोपवण्याची पद्धत दिसते. ही आया मोलाची धनी असते. दिवसभर मुलांच्या मागे असल्याने रात्री फार त्रास घेत नाही. जे एक आई करेल ते ही आया कशी करेल? पर्यायाने मुलांना असुरक्षिततेची भावना होते.  त्यातून बाहेर जर काही प्रॉब्लेम होत असेल तर तो आयाला सांगून उपयोग नसतो आणि आईला ऐकायला वेळ नसतो. मग ही मुले न्यूनगंडाची बळी ठरतात. वय वर्षे १ ते ७/८ पर्यंत मुलांना आई वडिलांच्या सहवासाची गरज असतेच. कारण कदाचित एखादे मूल थोडेसे भित्रे असू शकते. एकटे झोपायची त्याला भीती वाटू शकते. पण पर्याय नसतो. मुलांशी सतत बोलत राहिले तर त्यांना पालकांबद्दल एक विश्वास वाटतो आणि ही मुले मग आपले प्रॉब्लेम त्यांच्याशी शेअर करतात. अशी मुले समाजातही जास्त आत्मविश्वासाने वावरताना दिसतात.