नमस्कार नीता,
रायन अमेरिकतला. लेखातली सगळीच मुलं अमेरिकेतीला आहेत. तुमचं म्हणणं काही अंशी खरं आहे, पण या देशात मुलं स्वतत्र झोपत असली तरी आया मात्र नसते, परवडतच नाही सर्वसामान्यांना.

विभक्त कुटुंबपद्धती हे कारण तर आहेच, पण मला वाटतं, घटस्फोट हे महत्वाचं कारण असावं. एकटं राहून मुलांना वाढविणं हे फार कठिण काम आहे. पण या लेखातील मुलांना आई वडिल असूनही या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे कुठल्या एकच अशा घटकाकडे बोट दाखविता येत नाही.

भारतीय मुलंही अगदी या टोकाला नाही तरी अशा प्रकारात अडकलेली दिसतात. मुळ शोधणं खरंच कठीण वाटतं.