रसिका जोशी यांच्या निधनाने धक्काच बसला. मध्यंतरी 'साम' वाहिनीवर त्यांची मुलाखत बघितली होती. त्यांना कॅन्सर होता हे तेव्हा कळले होते पण त्या इतक्या लवकर आणि इतक्या कमी वयात जातील हे मात्र मनातही आले नाही. आपला इतका मोठा आजारही त्यांनी इतक्या सहजपणे स्वीकारला होता हे पाहून नतमस्तकच व्हायला हवे. त्यांना मनः पूर्वक श्रद्धांजली. त्या तुमच्या सख्ख्या वहिनी होत्या का सुवर्णमयीजी?