मी रसिका जोशी यांची नाटके, चित्रपट इत्यादीपैकी फारसे काही पाहिलेले नाही. पण त्या, अरुण नलावडे आणि आणखी एक अभिनेत्री या तिघांनी मिळून केलेला एक अभिनव प्रयोग, 'गंमतजंमत', ह्याची तबकडी पाहिली (अनेकदा) आहे. त्यात ह्या तिघांनी वेगवेगळ्या विषयांवरील सहा छोटे छोटे प्रवेश पाठोपाठ केलेले आहेत. प्रत्येकात तीनच पात्रे आहेत पण तरीही सर्वांच्या अभिनयामुळे ते फार प्रभावी झाले आहेत. त्यात रसिका जोशी ह्यांच्या अभिनयाचे अनेक पैलू दिसले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

(लेख आणि पाठोपाठ त्यांच्या निधनाची बातमी हा योगायोग की त्यांच्या मृत्यूची चाहूल तुम्हाला लागली होती?)