संपूर्ण कथेत, प्रेमाच्या बाबतीत, 'शशांक', वाचकांशीही आडमार्गाने संवाद साधतो. प्रेमाचा 'खणखणीत' उच्चार कुठेच नाही. शेवटच्या परिच्छेदात शशांक 'जगापासून दूर आपल्या खोलीत, अश्रूंना मनमोकळी वाट करून देऊन' प्रेमाचा 'खणखणीत' उच्चार करतो.

 

अहो, काका पण तो तिच्यावर खणखणीत प्रेम करतो हे कथा वाचताना कळतेच की. मग शेवटी खणखणीत भावविव्हळ अनावश्यक वाटतो.

आणि जग कितीही परकं वाटलं तरी आई कधी परकी वाटत नाही.

हे काका अगदी खरे आहे. त्याच्या आईने त्याच्या डोक्यावरून साधा हात फिरवला असता तर ते पुरेसे असते. त्यानंतर दोन थेंब आभाळात आले असते तरी योग्य होते. काही गोष्टी न सांगताच सांगितलेल्या बऱ्या असतात.

जाऊ दे शशांक.. मला थोडे (जास्त नाही) अतीच वाटले आईचे संवाद. सोपऑपेरासारखे. पण लोकांना सोपऑपेरा आवडतो, हेही तेवढेच खरे.

 

शशांक आणि आईत या विषयावर एकाही शब्दाचे संभाषण नाही ,तरी पण, तिचं मुलावर 'लक्ष' असतं, त्याचं शर्वरी वरील प्रेम तिला 'ठावूक' असतं, तिची त्याला 'संमती' असते. (तसेच तिच्या मुलाला 'जितूभाय'ने पुन्हा एकदा तंगडी घालून पाडले आहे आणि शर्यत जिंकली आहे) म्हणून आईची उपस्थिती आवश्यक आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी 'शेवटच्या परिच्छेदात' आहेत. हे शेवटच्या परिच्छेदाचे महत्त्व आहे.

आईचे लक्ष असते वगैर वगैर म्हणून आईला शेवटच्या कथानकात इतकी हिस्सेदारी हवीच का. असा नियम आहे का.

चित्तरंजन

नोंद - शशांकच्या आईशी माझे भांडण नाही आणि जितूभाईचा मी आदमी नाही, किंवा शर्वरीवर कधी लाइन मारलेली नाही. विचारा वाटल्यास. तिघांनाही.