मेमेरी आणि इमॅजिनेशन या ब्रेन फॅकल्टीज म्हणून वापरणं वेगळं आणि त्यांचा भूतकाळ आणि भविष्यकाळ असा विचार करून स्वत:चं आयुष्य दुर्धर करणं वेगळं!
हे मला उत्तर देताना सुचलं! म्हणजे ती खरोखर वास्तविकता आहे, मी जगतो देखील लिहिल्या प्रमाणेच पण उत्तर देताना ते शब्दबद्ध होतं, इतरांसाठी व्यक्त होतं आणि मग त्याचा अनेकांना उपयोग होतो.
सत्य समजल्यावर माणूस सर्वज्ञ होतो याचा अर्थ वेळ आली तर तो विमान चालवू शकेल असा नाही, त्याला आयुष्य सोपं आणि सहज कसं करावं ते कळतं. स्वतः शी कनेक्टेड असलात की तुम्हाला अस्तित्वागत बुद्धीमत्ता उपलब्ध होते याचं साधं कारण असं की मग तुम्ही आणि अस्तित्व यात भेद राहत नाही.
संजय