या सुनीताबाईंच्या एका वाक्यातून त्यांची सगळी व्यथा व्यक्त होते.
जगताना किती मजा येणार ते आपला जगण्याचा दृष्टीकोन ठरवतो आणि तो अत्यंत व्यक्तीगत असतो.
'आहे मनोहर तरी' हे शिर्षकच त्यांचा सारा नजरीया दाखवतं. मी ते पुस्तक वाचून चकित झालो होतो. पु. लं. कडे नवरा म्हणून बघण्या ऐवजी एक बहुरंगी व्यक्ती म्हणून त्यांनी साथ केली असती तर त्यांचं जीवन तर सुखाचं झालं असतंच पण पु. लं. च्या प्रतिभेला आणखी खुमारी आली असती.
मला वाटतं त्यांच्या अतीविष्लेशक (ज्याला काहीजण बुद्धीमान म्हणतील) स्वभावामुळे त्यांनी पु. लं. वर प्रेम करण्या ऐवजी त्यांच्या प्रतिभेवर प्रेम केलं, अँड शी मिस्ड अ लव्हली लाईफ.
मी शक्यतो घडून गेलेल्या गोष्टींवर लिहित नाही कारण त्याचा काही उपयोग नसतो पण चुकीचा दृष्टीकोन कशी संधी गमावू शकतो हे मात्र या निमीत्तानी निश्चीत सांगावसं वाटतं.
संजय