मूळच्या इंग्रजी / हिन्दी शब्दांसाठी जर मराठी मध्ये प्रतिशब्द उपलब्ध नसतील तर, नवीन प्रतिशब्द बनवण्यास काहीच हरकत नाही. परंतु असे प्रतिशब्द बनवीताना काही गोष्टींचा विचार करणे अत्यावश्यक आहे जसे,
१. प्रतिशब्द मुळभाषेतील शब्दापेक्षा उच्चारायला क्लिष्ट नसावा.
२. प्रतिशब्द प्रचलीत मराठी शब्दांमध्ये सुटसुटीतपणे बसावा.
३. प्रतिशब्द वापरता यावा म्हणून आजून नविन प्रतिशब्द निर्माण करण्याची गरज पडू नये.
सर्वात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सध्याचे इंटरनेट. खुद्द इंटरनेट या शब्दासाठी सध्या "माहितीजाल" असा प्रतिशब्द प्रचलित आहे. इंटरनेट हे फक्त माहिती मिळवण्याचे साधन (search engine) नाही, तर बर्याच गोष्टी - देवाण घेवाण, ऑन्लाईन खेळ, पत्रव्यवहार, इत्यादी साठीचे माध्यम आहे. "माहितीजाल" हा प्रतिशब्द वरील उपयोगांना न्याय देत नाही. इतर काही शब्द जे मराठी मध्ये पूर्णपणे उचलण्याची गरज आहे - वेब पेज, लिंक, वेब साईट, डाउनलोड, अपलोड, ऍटॅचमेंट, इत्यादी.
जेव्हा मी गूगल वेब पेजसाठी मराठी अनुवाद करण्याच्या उपक्रमात सहभागी झालो, तेव्हा मला या गोष्टी जास्त प्रकर्षाने जाणवल्या.
- मंदार