त्यांनी  या ठिकाणी मराठी शुद्धलेखना संबंधी बरेचसे लिहिले आहे.

हो, आणि ते सर्व वाचून मराठी शुद्धलेखनाविषयी आस्था असणाऱ्यांच्या तोंडाला फेस आला होता.   मागे शुभानन गांगल ह्यांनी "शुद्धलेखनाचे नियम शून्य असावेत" ही पुस्तिका लिहिली होती, व ती अभिप्रायार्थ डॉ. मिलिंद मालशे ह्या भाषातज्ज्ञांकडे पाठवली होती. त्यांचा स्पष्ट व प्रतिकूल अभिप्राय इथे वाचा.
वर्तमानपत्रांतील बातमीदारांना/संपादकांना पटवून पान-पानभर लेख छापून आणल्याने कुणी एखाद्या शास्त्रीय विषयातील तज्ज्ञ ठरत नसतो, आणि संशोधन करण्याआधी विषयाच्या मूलतत्त्वांचा पाया  भक्कम असावा लागतो. केवळ प्रसिद्धीतंत्रावर हुकुमत असणं पुरेसं नसतं.