खरंतर, या विषयावर मी पंधरा दिवसांपूर्वीच प्रतिसाद दिला होता. पण काय झालं कुणास ठाउक, इथं काही तो दिसला नाही.
असो.
आम्ही घरात दोन भाषा बोलत असलेने दोन्ही भाषेतील नियतकालिके आम्ही वाचतो. कन्नडमधील "तरंग" तर मराठीतले "चित्रलेखा" किंवा "साप्ताहिक सकाळ". काही वर्षांपूर्वी "जी" नावाचं एक मासिक यायचं, ते आम्ही वाचायचो. आता कदाचित ते बंद झालं (असावं)
ह्यां व्यतिरिक्त, इतरही नियतकालिके (अर्थात् दोन्ही भाषेतील)
मराठीः चांदोबा
कन्नड: कर्मवीर, मयूर, कस्तुरी, सुधा....(अगदी पूर्वी प्रजामत नावाचंही एक नियतकालिक आमच्याकडे यायचं)
इंग्रजीः ऑटो इंडिया, इंडियन ऑटो, काँपिटिशन सक्सेस रिव्हिव, ओव्हरड्राईव्ह, जीके टुडे.
वर्तमानपत्रांत म्हटलं तर आम्ही सकाळ वाचतो, आणि इंग्रजीतला टी ओ आय वाचतो. कन्नडमधलं वर्तमानपत्र कधी तरीच-प्रजावाणी.
आतापर्यंत आवडलेलं मासिक म्हणजे "चित्रलेखा" आणि "तरंग".
----------------------------कृष्णकुमार द. जोशी