उखाणे नको स्पष्ट दे फैसला तू
जगी मी जगू की खुशीने मरावे

येथे 'फैसला' ऐवजी न्याय किंवा निवाडा चालेल का?

उखाणे नको स्पष्ट दे न्याय मज तू
किंवा
उखाणे नको स्पष्ट दे न्याय आता
किंवा
उखाणे नको स्पष्ट दे तू निवाडा
किंवा
उखाणे नको स्पष्ट कर तू निवाडा

असे काही केले तर कसे वाटेल?
अर्थात अधिकार तुमचाच आहे.