मंदार महाशय,

आपण योग्य स्थळी विराजमान दिसता.

इंटरनेट = माहितीजाल हा शब्द योग्यच वाटतो. वस्तुतः इंटरनेट हाच शब्द 'माहिती' हाताळण्या च्या मुख्य कामाला न्याय देत नाही असे वाटते.

मला सुचलेले तुम्हाला आवश्यक वाटणार्‍या शब्दांचे प्रतिशब्द खाली देत आहे. त्यांचा अवश्य विचार करावा, ही विनंती.

वेब पेज = संकेतपर्ण

लिंक = जुळणी

वेब साईट = संकेत स्थळ

डाऊनलोड = उतरून घेणे (माहिती)

अपलोड = चढवणे (माहिती)

ऍटॅचमेंट = संलग्न दस्तऐवज

इतरही सर्व मनोगतींनी ह्या शब्द समर्थनाच्या चर्चेत सक्रीय सहभाग घ्यावा अशी मी आग्रहाची विनंती करीत आहे.