श्री. चित्त,

आपल्या भावना कळल्या.
वेळो-वेळी शशांकने मनातील कोमल प्रेम भावना लपविण्याचा प्रयत्न केला आहे किंवा तो संकोचला आहे. आपण त्या भावना ओळखतो ही गोष्टच वेगळी. त्याच्या दृष्टीने त्याने त्याच्या भावना 'यशस्वी' पणे लपवल्या आहेत. पण भावनिक कडेलोट झाल्यावर त्या भावना लपविणे त्याला 'अशक्य' होते. असो.

आख्ख जग परकं झालं असता (म्हणजे शशांकला तसे वाटत असता), त्या शुष्क घडीला, आईच्या मायेच्या 'शब्दांचे' महत्त्व शशांकला त्रैलोक्याच्या सिंहासना पेक्षा अधिक आहे. अशा अनमोल व्यक्तीवर दोन शब्द न लिहीणं नुसती कंजूषगिरीच नसती झाली तर तो कृतघ्नपणाही ठरला असता.
असा नियम आहे का. नाही. कथा भावभावनांतून उमलत जाते, नियमातून नाही. ती 'शर्वरी'च्या लग्नाच्या 'बातमी'लाही संपू शकली असती, गुजराथी घाटणीच्या नव्याकोऱ्या लग्नपत्रिकेवरही संपू शकली असती आणि प्रत्यक्षात जिथे संपते तिथेही संपू शकते. कथेचा शेवट आपल्याला रुचलेला नाही याची नोंद घेतली आहे. माझ्या दृष्टीने जग वैरी झाल्यावर 'शशांक'ने स्वतःला आपल्या खोलीत कोंडून घेणे स्वाभाविक आहे. असो.