प्रभाकर,
रंगीबेरंगी ची चारही भाग छान जमले आहेत. शशांकला शर्वरी मिळाली नाही हे वाईट झालं, पण शेवटी लग्नगाठी स्वर्गात जुळलेल्या असतात म्हणतात ना तेच खरे. 
शशांकचे दुःख सर्वात जास्त व्यक्त होते आहे ते  'अरे, पाहाताय काय असे. मी म्हणालो नव्हतो शऱ्या तुला, आमची नुसती मैत्री होती. तुमचाच कांही तरी गैरसमज झाला होता.......... आ...णि.. कदाचीत......माझाही?' मधून. आणि शशांकची शर्वरीवरुन गोड थट्टा करणारा शरदच त्याला शर्वरीच्या लग्नाची बातमी देतो हा योगायोग सर्वात करुण आहे. शशांक अजून मनात रेंगाळतो आहे. आजकालच्या जगात असे भाबडे प्रेमी मिळत नाहीत. (तरुण/तरुणी दोन्हीना वाक्य लागू आहे.)