तत्कालीन वर्गाधिष्ठित समाजरचनेतील शेतकऱ्याची पिळवणूक दिसते. इथे मला शेतकऱ्याच्या औदार्यापेक्षा त्याची अगतिकता जास्त उठून दिसते, समाजरचनेतील आर्थिक, वर्णाधिष्ठीत किंवा व्यवसायाधिष्ठित उतरंड दिसते, वैद्याचा लालसापूर्ण अडेलतट्टूपणा दिसतो. खरेच चार ओळीत फारच खोल अर्थ भरलेला आहे. ज्या दृष्टिकोनातून विचार करू तसा. कोणताही अभिनिवेश न आणता रचलेल्या ओळीतून वास्तव चांगले व्यक्त झाले आहे.