शशांकचे दुःख सर्वात जास्त व्यक्त होते आहे ते 'अरे, पाहाताय काय असे. मी म्हणालो नव्हतो शऱ्या तुला, आमची नुसती मैत्री होती. तुमचाच कांही तरी गैरसमज झाला होता.......... आ...णि.. कदाचीत......माझाही?'
खरे आहे अनु, शशांकच्या डोक्यावर वीज कोसळलेली असते. मन दुभंगते. तरीही स्वतःला सावरण्याचा एक केविलवाणा प्रयत्न.........
शरद त्याला म्हणतोही, '(विचार केला नसशील तर) निदान आतातरी कर. नाहीतर शर्वरीच्या लग्नात गुलाबपाणी शिंपडायचे काम करावे लागेल.' आणि शशांकने 'फारच' उशीर केला हे सांगायचे कामही शरदच्याच नशिबात येते. दुर्दैव.
आजकालच्या जगात असे भाबडे प्रेमी मिळत नाहीत. (तरुण/तरुणी दोन्हीना वाक्य लागू आहे.)
कमी झाले आहेत हे नक्की. पण........ शोधल्यास सापडतीलही. अगदी निराश होऊ नये.
अभिप्राया बद्दल धन्यवाद.