मी काही खूप मोठा माणूस नाही परंतु मराठीसाठी मी माझ्याच्याने होईल तेव्हढे करतो जसे,
१.माझी परिस्थिती माझ्या मुलांना चांगल्या इंग्लिश ( तथाकथित ) शाळेत घालण्यासारखी असूनही मी त्या दोघांनाही मराठी शाळेत घातले आहे आणि याचा मला प्रचंड अभिमान आहे.
२.कोणीही अमराठी उपट सुंभ भेटू दे मी त्याच्याशी मराठीतच बोलतो.
३.ज्या बाबतीत आपण खरोखरीच मागासलेले आहोत ते मी मनपूर्वक मान्य करतो आणि ते सुधारण्याचा प्रयत्न करतो ,त्यासाठी मी मराठीचा ( तिच्या त्या ठिकाणी गरज नसलेल्या अस्मितेचा ) उगीचच सहारा घेत नाही.
४.मराठीची पुस्तके मग ती कोणत्याही विषयावर असू दे ,मी त्यांचे वाचन करतो आणि घरी त्यांचा संग्रह करतो.आणि कोणाच्या कोणत्याही कार्यक्रमात त्यांची भेट देतो.
५.मराठीची अशी पूजा करीत असतांना मी दुसर्या भाषेसही महत्व देतो,त्यांना कमी लेखित नाही मात्र माझ्या मायबोलीला कोणी कमी लेखित असेल तर मात्र मी त्याला उलटा पाडतो.
६.मी रोज माझी दिनचर्या ( रोजनिशी ) लिहितो त्यामुळे मी सदोदित मराठीच्या सहवासातच असतो.
७.मराठीच्या इतिहासाबद्दल मी सत सत विवेक बुद्धी ठेऊनच चर्चा करतो.इतिहासात ज्या काही आपल्या चुका झाल्या त्या मी मान्य करतो मात्र महाराजांविषयी कोणीही काहीही चुकीचा जर बोलला तर मात्र मी पिसाळतो आणि त्याचे मुस्काट फोडयलाही मागेपुढे पाहत नाही.