आतापर्यंत एखाद्या वंद्य व्यक्तिला आदरांजली म्हणजे त्या व्यक्तीच्या नावाचा रस्ता, पोष्टाचे तिकीट, नाणं, पुतळा, संस्था किंवा तत्सम काही असं असायचं.
तुमचा विचार वेगळा तर आहेच, पण क्रांतीकारीसुद्धा आहे.खरंच, तात्यारावांचा त्याग कुठल्याही शब्दप्रभूला शब्दबद्ध न करता येण्यासारखाच आहे. कारण अश्या त्यागाला मराठीत शब्दच नाही. त्यामुळं "यासम हाच" प्रमाणं, सावरकर हाच शब्द "त्या" त्यागासाठी समर्पक ठरू शकतो.
"विदासा" हा शब्द न राहता एक जीवनशैली, एक विचार व एक तत्त्व व्हावं, नाही का?
माझा या उपक्रमास पूर्ण पाठिंबा आहे. शेवटी, तात्यारावांच्या शब्दात,
"तुजसाठी मरण ते जनन,
तुजवीण जनन ते मरण"