श्री. मळेकरांची तळमळ स्तुत्य आहे. पण संसदेतील तैलचित्राला विरोध करणारे कृतघ्न सत्तेत असतांना, त्यांनी शासनाकडून केलेल्या अपेक्षा 'अरण्यरूदन'च ठरेल. ८ जूलै २०१० ला ज्या उडीला १०० वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी मी तरूण मुलांना सावरकर परिचय व्हावा म्हणून "अष्टविनायकदर्शन-पण जरा वेगळे" ही २८ पानी पुस्तिका प्रकाशित केली. ती एक प्रतिकात्मक कृती होती.
त्याशिवाय मी बुकगंगा. काम तर्फे अष्टविनायकदर्शन हे इ-बुक मार्च २०११मध्ये प्रकाशित केले आहे. ते त्या संकेत स्थळावर पाहाता येते.
पण त्या पुस्तिकेची सुधारीत दुसरी आवृत्ती सोलापुरच्या स्वा. सावरकर विचार मंचाने ९ जुलै २०११ला एका शानदार समारंभात प्रकाशित केली. त्याचे श्रेय सपूर्णपणे मंचाचे अध्यक्ष श्री शरद बनसोडे यांना आहे.
अशा वैयक्तिक आणि सामुदायिक प्रयत्नातून, सावरकर नव्या पिढीपर्यंत पोहचविणे आपल्या हाती आहे. या माझ्या प्रयत्नांची हकिकत मी लवकरच लेखरूपाने मनोगतवर मांडणार आहे.