भक्तगणहो. यापुढे श्रीमंत देवस्थानांना आणखी श्रीमंत करू नका.
आता देवस्थानांच्या संपत्तीची मोजदाद चालू आहे. ही चांगली गोष्ट आहे. गरीबांच्या कल्याणासाठी ओक्साबोक्षी
रडत, नेते त्यावर आपले नियंत्रण आणायला बघतील. यांनीच तर सरकारी खजिन्याचे तीन तेरा केले आहेत.
(केवळ सुप्रीम कोर्टामुळे) तिहार जेलच्या आत असलेल्या नेत्यांना अजून बाहेर असलेले त्यांचे भाऊबंद कसेही
करून सोडवण्याच्या खटपटीत आहेतच. तेव्हां कोणत्याही परिस्थितीत ही संपत्ती सरकारी तिजोरीत जाऊ देऊ नका.
ज्या कोणी ही संपत्ती कोणत्या का कारणाने जतन केली, त्यांचे आभार माना.