विषय आहे खरा. मलाही असा गृहीत धरण्याचा अनुभव अनेकदा आलेला आहे. पुन्हा केलं त्याचं काही नाव नाही!

पण अप्रत्यक्षपणे सुचविणे, आडून आडून बोलणे हाच उपाय मी तरी अवलंबित असते. कारण डायरेक्ट सांगीतलं तर संबंध कायमचे खराब होण्याची खात्रीच. बरं आपलं मन तरी असं, की असं काही बोलून तर बसू, आणि मग आपलंच आपल्याला खात राहील. (असे कितीदा येत होते ते, काय अशी आपली गैरसोय झाली इ.इ...) फार तर अगदी धावून धावून त्यांचे आदरातिथ्य करणे थांबवावे..