नातेवाईक झाले तरी प्रत्येकाचे घर ही ज्याची-त्याची खाजगी मालमत्ता असते. तिथे कोणीही केव्हाही येणे हे चूकच.आपल्याकडून  एखाद्यावेळी काही कारणाने असे झाले तरी आपण दहा वेळा सॉरी म्हणतो. हे प्रकरण वेगळेच दिसते. केदारजी 'भीड भिकेची बहीण' हे नेहेमी लक्षात ठेवा. आजच्या दिवसात एखादा मोठा माणूसही आयत्यावेळी जेवायला खायला भारी पडतो. त्यात आणखी २-४ जणांना घेऊन म्हणजे जरा अतीच झाले. केदारजी ज्या 'नातेवाईकांना' आपल्या गैरसोईची पर्वा नाही त्यांची पर्वा आपण का करायची? हा विचार करा की असे जर तुम्ही तुमच्या कुटुंबासहित केव्हाही त्यांच्या घरी जाऊन धडकलात तर त्यांची काय प्रतिक्रिया असेल? मला स्पष्टपणे असे वाटते की तुम्ही वेळीच त्यांना हे नजरेस आणून द्यावे. एक विचार करा की असले नातेवाईक मग ते कितीही  जवळचे असले तरी काय कामाचे? ते तुमच्या वेळेला कामाला पडणारच नाहीत. मग ते जोडून काय फायदा? त्यामुळे कितीही अवघड वाटले तरी एकदा याचा निकाल लावा. जखम बरी व्हायची असेल तर वरवर औषध लावून फायदा नसतो. ती चिघळते. ती  दुखावल्याशिवाय बरी होत नाही. एकदा ती स्पिरीटने धुतली की थोडावेळ झोंबली तरी बरी हमखास होते.