एवढा महत्वाचा विषय चांगल्या प्रकारे ऐरणीवर घेतल्याबद्दल आपणा सर्वांचे हार्दिक आभार!
मला वाटते बरेच वेळा गरज नसतानाही आपली मंडळी इंग्रजी शब्दांना अक्षरशः मध्येच कोंबतात. आता हेच पहा ना छान, उत्कृष्ट, उत्तम, चांगले अशा शब्दांची चंगळ असताना BEST हा इंग्रजी शब्द कशाला वापरावा? असो.
मला पण एका शब्दाची भर टाकावी वाटली.
"कंठलंगोट" हा अत्र्यांचा शब्द. पण त्याच्या संदर्भामुळे लोक बहुधा वापरायला बुजत असावेत.
आपला,
(मरठीप्रेमी) भास्कर