> आपले कधीही कशावरही एकमत होऊ शकेल असे वाटले नव्हते; आज त्या विश्वासाला तडा गेला, आभारी आहे.

= पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं लेखन जेव्हा एखाद्याला समजतं किंवा पटतं तेव्हा तो स्वतःशीच सहमत झालेला असतो कारण वाचताना तुम्ही, समोरचा स्क्रीन आणि तुमचं इंटरप्रिटेशन या तीनच गोष्टी उपस्थित असतात. तुम्ही स्वतःशी सहमत झालात की तुम्हाला शांत वाटतं, यू हॅव कम बॅक टू योरसेल्फ! माझ्या लेखनाचा उद्देश एखादी गोष्ट पटवणं असा वरपांगी दिसत असला तरी अत्यंतिक उद्देश तुम्हाला तुमच्याशी एकरूप करणं आहे; हे एकदा समजलं की माझं म्हणणं तुमच्या पर्यंत पोहोचू शकेल.

>प्रतिसादातील मुद्दे पटले. मात्र, शीर्षकातील रामायणाच्या उल्लेखामागील संदर्भ लक्षात आला नाही.

= रामायण ही वाल्मिकीनी लिहिलेली आदर्श पुरूषाची कथा आहे. रामायण घडल्यावर ती लिहिली किंवा कथेप्रमाणे रामयण घडलं किंवा ती फक्त कथा आहे किंवा काय यात मला अजिबात रस नाही त्यामुळे अशा तऱ्हेच्या प्रतिसादांना मी काहीही उत्तर देणार नाही.

वाल्मिकी हे पूर्वायुष्यात वाल्या कोळी होते म्हणजे ते जीवनातल्या पराकोटीच्या हिंसक परिमाणाला पोहोचले होते. अशी मानसिकता त्या व्यक्तीला दुसऱ्या पराकोटीच्या परिमाणाचं अनिवार आकर्षण निर्माण करते, तो मनाचा स्वभाव आहे, इट वाँटस टू मूव्ह इन एक्स्ट्रीम्स. 

आता या महाकथेत वाल्मिकीनी इतका आदर्श पुरूष निर्माण केला की ज्याच्या नुसत्या स्मरणानी वाचकांच्या मनातली अनैतिकता दूर व्हावी; पण त्या प्रयत्नात कथा इतकी पुढे गेली की ज्या सीतेसाठी (खरं तर वडीलांनि सावत्र आईला दिलेल्या वचनापायी) स्वतःचं संपूर्ण आयुष्य पणाला लावणारा कथानायक जेव्हा कथा संपली असं वाटतं, दुष्टाचं संपूर्ण निर्दालन झालंय असं वाटतं,  सुखाचा काळ येतो तेव्हा एका सामान्य व्यक्तीच्या रिमार्कपायी अग्नीपरीक्षा वगैरे केलेली आणि दोन मुलं असलेली स्वतःची पत्नीच त्यागतो! इतक्या अँटीक्लायमॅक्सची खरं तर गरज नव्हती पण एकदा मन एक्स्ट्रीमला जायला लागलं की ते दुसरं टोक गाठल्याशिवाय थांबत नाही. ज्या  पत्नीबरोबर उर्वरित आयुष्य घालवायचंय तिच्याशी बोलून प्रश्न सहज सोडवता आला असता आणि नाही तरी रावण गेलेलाच होता पण 'लोकांना काय वाटेल' या एकमेव काळजीपायी ही परिस्थिती ओढवली, कळलं?

संजय