आदरणीय प्रभाकरकाका,

 आईसाठी दोन शब्द लिहिणे कंजूषपणा ठरला असता, असे कथाकाराच्या भूमिकेतून म्हणता की शशांकच्या. आपण हा कंजूषपणा केला नाही, हे बरे केले. मग, आता ह्या कथेचे शीर्षक माझा प्रेमभंग आणि आईची माया असे कलेले बरे, असे माझ्यातला टवाळाला वाटते.

शशांकला कोंडून टाकणे स्वाभाविक असले तरी त्यात कथनीय काही नाही. त्यात पंचही (इंग्रजीतला, फ्रूट पंचमधला) नाही. शशांकने अगदी आत्महत्या केली असती तरी त्यात कथनीय काही नाही.

गुजराती धाटणीच्या लग्नपत्रिकेवर कथा संपली असती तर इतक्या छान कथेला मस्त शेवट मिळाला असता.

कुठे थांबावे हे लेखकाला, कवीला माहीत असणे महत्वाचे आहे, असे जाणकार म्हणतात. आपण बुजुर्ग लेखक आहात. आपण योग्य ठिकाणीच कथानक थांबवले असेल.

आपला नम्र,
चित्तरंजन