आय अ मॅन ऑफ इसेन्स अँड नॉट द डिटेल्स, हे मी नम्रपणे नमूद करतो. डिटेल्स मी लक्षात ठेवत नाही किंवा त्या माझ्या लक्षात राहत नाहीत आणि त्या बाबतीत माझी चूक होऊ शकते पण मुद्द्याबाबात मी निर्विवाद आहे.

मी निर्विवाद असतो याचं कारण एकदम साधं आहे, मी जे लिहितो ते माझं स्वतःचं वर्णन असतं, आय ऍम नॅरॅटींग मायसेल्फ! सत्य आणि मी यात आता काहीही फरक उरलेला नाही त्यामुळे माझी मुद्द्यावर चूक होऊ शकत नाही आणि मला काही आठवावं लागत नाही. मी कुणाही समोर आणि कोणत्याही प्रश्नाचं माझ्याकडे एकही कागद नसतांना उत्तर देऊ शकतो कारण व्हेन आय कॅरी मायसेल्फ आय डोंट हॅव टू कॅरी एनी नोटस.

मला सीतेला मुलं झाली होती की व्हायची होती यात काहीही स्वारस्य नसतं, फक्त एक मुद्दा विषद करायचा असतो तो म्हणजे इतक्या भव्य महाकथेचा इतका पुअर शो होऊ शकतो का तर 'दुसऱ्याला आपल्याबद्दल काय वाटेल, लोक काय म्हणतील? ही विवंचना!  आय थिंक आय हॅव ड्रिव्हन द पॉइंट होम.

मला देखील तुम्हाला हेच सांगायचंय जोपर्यंत तुम्ही डिटेल्समध्ये इंटरेस्टेड आहात तोपर्यंत तुम्ही प्रसंग आणि घटनात अडकाल आणि ज्या क्षणी तुम्हाला मुद्दा कळेल त्या क्षणी तुम्ही स्वतःप्रत याल.

या प्रतिसादामुळे मला पुन्हा अभिव्यक्त होण्यची संधी मिळाली, आभार!

संजय