व्यर्थ मी आव्हान अंधारा दिले
वादळे हसली दिवा मी लावता!छान.
ही धरा आनंदली, उन्मादली
त्या नभाच्या पापण्या ओलावता! -
एकही बोली न लावावी कुणी?
मी स्वतः मजला पणाला लावता!भावना पोहोचल्या, त्या दृष्टिकोनातून द्विपदीही आवडली. परंतु एखादी गोष्ट पणाला द्युतात लावतात, आणि बोली लिलावात लावतात. ही मोट कशी बांधली ह्याचा विचार करतो आहे.