आवडले हे वे.सां.न.ल.
नामदेवांनी देवाला दूध पाजल्याचा अभंग नसला, तरी एक दुसरा अभंग माझ्या ऐकण्यात आला होता.
विट्ठल नामदेवाबरोबर भोजन करतात असं त्यात वर्णन आहे. (पण ही बहुतेक नामदेवांनी लिहिलेली रचना नसावी.)
नाम्याने नैवेद्य कुंचीखाली झाकिला,
आणून ठेविला देवापुढे ।
नामा म्हणे आमुच्या वडिलांची ठेव,
सापडले धन वीटेवरी ।
नाही शेंबुड-लाळ, नाही अमंगळ,
केली मी अंघोळ चंद्रभागे ।
आणीन मी धोंडा, फोडीन मस्तक,
करीन घात मी प्राणाचा ।
पाषाणाची मूर्त कापे थराथरा,
जेवी भराभरा नाम्यासंगे ॥
नामा म्हणे आमुच्या वडिलांची ठेव,
सापडले धन वीटेवरी ।