एकतर आपण जशी आपली प्रतिमा जपायचा प्रयत्न करतो तशी दुसराही करतो त्यामुळे तो स्पष्टपणे बोलणार नाही.

दुसरी गोष्ट, नातेवाईक जर मध्यस्थाला 'तुम्हाला काय करायचंय आम्ही आमचं पाहून घेऊ' म्हणाले तर तो निष्कारण स्ट्रेट ड्राईव्ह होईल आणि त्याचा अपमान झाल्यानी आपले मध्यस्थाशी संबंध बिघडतील.

तिसरी गोष्ट, तुमच्या किंवा तुमच्या आधीच्या पिढीसाठी संबंधीत नातेवाईकानी काही केलं असेल आणि त्याबदल्यात ते ही सरबराई घेत असतील तर तुम्हाला काही सुद्धा स्टँड घेता येणार नाही, तुम्हाला गुमान आदरातिथ्य करायला लागेल कारण त्या चर्चेत तुम्ही हजर नसाल, किंवा मग एकदा होऊनच जाऊ दे म्हणून तुम्हाला सोक्षमोक्ष करायला लागेल.

चवथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यात प्रामाणिकपणे स्पष्ट बोलायचं साहस कधीही येणार नाही, आपला भिडस्तपणा जसाच्यातसा राहील.

संजय