लेख अप्रतिम झाला आहे. सुनिताबाईंबद्दल खूप आदर, कौतुक वाटत आले आहे, तरीही लेखात मांडलेली बाजू आधी लक्षात आली नव्हती. आणि आता तर ते दोघेही नाहीत त्यामुळे लेखात आणि प्रतिक्रियांमध्ये व्यक्त केलेली शंका कधी कळणारही नाही. (तशीही कळली नसतीच, त्या दोघांचा स्वभाव तसा नव्हताच.)

फक्त जे पुलंच्या पत्र नष्ट करण्याबाबत म्हटले आहे त्याबद्दल खात्री नाही. कारण नव्वदच्या दशकात (नक्की साल आठवत नाही) सुनिताबाईंनी चक्क सकाळच्या वाचकांच्या पत्रात लोकांना त्यांच्याकडे पुलंनी पाठवलेली पत्र असतील तर त्याची कॉपी त्यांना पाठवण्याची विनंती केल्याची मला नीट आठवते आहे. बहुतेक त्यांनी तेव्हा चित्रमय स्वगतचे काम सुरू केले असावे.