प्रभाकर काका,

२,३,४ हे भाग आजच एकदम वाचले म्हणून प्रतिसादही एकदम होलसेल मध्येच देतोय. मस्तच लिहिली पुर्ण कथा आपण. काय एकेक उपमा दिल्यात ! कुत्रीला गायनॅक च्या खाली जागा हवी होती म्हणजे भन्नाटच कल्पना- हाही भाग सुरेख जमला.

शशांकने शर्वरीला आपल्या मनातले प्रेम उघड करून दाखवले नाही ती त्याचीच चुक होती - पण हे होतच असं कधी कधी - मुले हजारो उपद्व्याप करतील - खुप शुर असल्याचा आव आणतील - पण पोरींच्या (तेही लाईन चालू असलेल्या) पुढे आले की ट्यांय...... ट्यांय...... फिस्स्स् ! जितू पटेल मात्र बेरक्या निघालेला वाटला - तर शर्वरीची आई एकदम फटेल.

कथा आवडली हे परत आवर्जून सांगणे-

मालकंस