स्पष्ट बोलायचे आणि संबंध कायमचे बिघडायचे हे नको असेल तर गनिमी काव्यानेच लढावे.
१) 'ते' आल्यावर कुर्म गतिने कामे करत करत त्यांना अत्यंत साधे खाणे पिणे (जे आपण पाहुण्यांसाठी कधी करत नाही पण आपण आपल्या घरी करतो, त्यांचा आस्वाद घेतो - असे पदार्थ करणे - उदा. फोडणिचा भात, पिठले भात, कारल्याची भाजी, नुसतिच खिचडी (कढी सुद्धा नाही त्या बरोबर! ), मॅगी नुडल्स, वडा पाव, आपण स्वतः खात असल्यास ऑमलेट पाव किंवा भुर्जी पाव, ईत्यादी! आणि वर बोलायचे... 'आज आमच्या कडे असा झक्कास बेत आहे अमुक अमुक चा!! वा!! ' असे म्हणून ताव मारावा! अर्थात हे औषध निदान दोन्न ते तीन वेळा करावा लागेल तर समज येइल.
२) चला, आज आपण बाहेर जाउया जेवायला, असे म्हणून त्यांना त्यांच्या घरापासून तुमच्याकडे आले त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला बरेच लांब कुठेतरी घेउन जावे. म्हणजे जेवणखाण झाल्यावर त्यांना त्यांच्या घरी जायला उशिर होइल, आपण मात्र आधी घरी पोहोचून आराम करू शकाल.
३) देव करो आणि अशी वेळ कधी न येवो, पण आपल्या घरात कुणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यास 'त्या' लोकांना विसरू नये! त्यांना फोन करून हॉस्पिटलमध्ये बसायला बोलावणे, पेशंट साठी डबा वगैरे पाठवायला सांगणे अशी अनेक कामे हक्काने त्यांच्या गळ्यात घालून त्यांना जेरिस आणणे असले प्रकार करा... ते तुमच्या पासून दोन हात दूर राहतात कि नाही पहा!
४) गांधिगिरी करायची असेल तर:- फक्त त्यांच्यापुरतेच जेवण / खाणे करा, आणि त्यांना सांगा, आज आम्हाला आमच्या एका मित्राकडे जेवायला जायचे आहे. मित्राकडे उशिरा गेलो तरी चालेल पण न गेले तर चालणार नाही - तो रागावेल, त्याची बायको गैरसमज करून घेइल, वगैरे वगैरे... आणि मग ते हे ऐकून झटपट गेल्यावर आपण आपल्या मर्जिनुसार काहिही करावे!
५) गांधिगिरी करायची तर अजून एक उपायः- आपण त्यांच्या घरी ऐन जेवणाच्या वेळी जायचे.. पण जेवायला नाहि! बाहेर जेवून मग त्यांच्या घरी जायचे. जाताना काहितरी गोड (आइस-क्रीम, तत्सम) घेउन जायचे आणि त्यांना सांगायचे कि आम्ही इकडे एका कामाला आलो होतो, म्हणून तुम्हाला भेटायला आलो पण आयत्या वेळी जेवायला यायला मला कसेतरिच वाटले, म्हणून बाहेर जेवून आलो आहे... हे आइस-क्रीम आणले आहे.. ते खावुया ना आपण सगळे - तुमचे जेवण झाल्यावर! तुमचे जेवण होउदे सावकाश! आणि त्यांनि आग्रह केलाच तरी 'छेः अशक्य आहे, आकंठ जेवण झाले आहे.. मी काही लाजत नाहि, पुन्हा येवू कधी तरि, पण आधी ठरवून येवु, अचानक आल्यावर वहिनिंना चार पदार्थ करता नाही येणार आणि मग त्यांनाच कसेतरी वाटेल! त्यापेक्षा मस्त कधी तरी ठरवून बेत आखून येतो! असे अनेक संवाद तयार करून जाता येइल!