केदारजी, कोणी आपल्याला आधी कळवून येत असेल तर आपण 'घरी नाही आहोत', किंवा 'आधीच पाहुणे आले आहेत', अशी कारणे पुढे तरी करू शकतो. पण आयत्या वेळी टपकणाऱ्याला काय करणार? त्यामुळे त्यांना आधी समजावून सांगून बघा. म्हणजे "तुमच्या अशा अचानक येण्याने घरच्या गृहिणीला त्रास होतो. शिवाय तुम्ही आणखी माणसे घेऊन आलात तर त्रास आणखीच वाढतो. तुमच्याकडे असे कोणी आले तर तुम्ही काय कराल?" असे सांगून बघा. कारण कदाचित तुमची अडचण त्यांच्या लक्षात येत नसेल. (खरं तर लक्षात न येण्यासारखी ही गोष्ट नाही) तरीही जर फरक पडला नाही तर मात्र ही व्यक्ती दया करण्याच्या लायकीची नाही हे समजून जा. आपल्याला आपल्या रामदास स्वामींनी सांगितलेच आहे " भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथा हाणू काठी".