मी नमुद केलेले उपाय खरे करून पाहिलेले आणि गुण आलेले तेव्हढेच आहेत. अन्य उपाय आहेत, त्यातले काही अजून करून पहायचे आहेत आणि त्यामुळे त्यांच्या उपयोगाबाबत आज काही सांगता येणार नाहि आणि काही उपाय म्हणजे रोगापेक्षा उपाय जालिम म्हणतात त्यातली गत झाली म्हणून वगळले! म्हणून आपला पेच आणि आपला सरळ स्वभाव लक्षात घेउन मोजके उपाय सुचवले. आपण म्हणताय कि काही उपाय करून झालेले आहेत, पण गुण आला कि नाहि? रोग chronic & persistent असल्यास operation  करावे लागेल!

'ते' उरलेले उपाय करमणुक म्हणून हवे असल्यास सांगू शकतो.. पण तो नुसताच timepass  होइल! आपण गंभिरपणे विचारताय आणि आम्ही timepass करायचा.. हे नाही बुवा आपल्याला आवडणार!

असो, तो 'लिंक पाठवा' चा उपाय 'गंमत म्हणून सुचवला' इतपत ठीक आहे, पण सरळ सरळ तोंडी बोलायला कचरत असताना लेखी कळवण्याचे धाडस करायला कोण तयार होइल? म्हणजे, तो फक्त एक विनोद म्हणून छान आहे, उपाय म्हणून नव्हे. आता संजयराव असे म्हणू नका, कि तो विनोदच होता. कारण आपणच केदार साहेबांचे शेवटचे उत्तर वाचून आश्चर्य व्यक्त केले आहे कि त्यांनी केवळ गंमत म्हणून हा चर्चा-प्रपंच केला? म्हणजे आपण गंमत करत नव्हता गंभीर होता!