प्रेम कळवायला पत्र लिहिणे नक्किच चांगले आहे कारण त्यात भावना 'प्रेमाचि' आहे. पण जेव्हा बोलून देखिल संबंध बिघडण्याची भीती वाटते अश्या वेळी लेखी निरोप देणे त्या भिडस्त माणसाला जमणे शक्यच नाही आणि त्या प्रकरणाचा अंत देखिल हवा तसा न होता कटुता येउन घडेल, निश्चितच! शिवाय या चर्चा प्रपंचाची 'लिंक' पाठवणे म्हणजे जरा अतीच झाले. म्हणजे जिथे सुंठीवाचून खोकला जाण्याची शक्यता आहे, सुंठ तिखट असते म्हणून चिमुटभर देखिल घ्यायची तयारी नाही त्या व्यक्तीला आडवे पाडून सुंठीचा भडिमार करणेच झाले! (प्रेमपत्र आणि एसएमएस हे फक्त खाजगी - त्या दोन व्यक्तिंपुरते मर्यादित राहतात. अशी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी 'लिंक' पाठवणे म्हणजे गावातून धिंड काढणे होइल नाही का?)
सबब, सदर प्रकरणी साम, दाम, दंड आणि काहिच उपयोगाचे नाही तर मग भेद असेच करावे लागेल.
सामः मी अगोदर सांगितलेले २-३ उपाय - ज्यात सामोपचाराने (सुंठीवाचुन) काम होते.
दामः गांधिगिरी चे उपाय. कारण त्यात आपल्याला दाम मोजावे लागणार आहेत.
दंडः कुणितरी सुचवलेला उपाय - अचानक त्यांच्या घरी पाच सात किंवा दहा बारा माणसांची जेवणावळ घडवून त्यांना 'दंड' करणे. (जेव्हढा जबर गुन्हा तेव्हढा जबर दंड!)
भेदः सरळ सरळ एक घाव दोन तुकडे करून टाकणे.
असो, चर्चेला वेगळेच वळण लागेल असे वाटू लागले आहे! माझ्या कडून हवे तर पांढरे निशाण दाखवतो.
पांढरे निशाण अशासाठी, कि या सगळ्यात आपण कशाला उगीचच आपले आपसातले संबंध बिघडवायचे?!!