लेखातील बहुतेक अनुभवांशी सहमत. मात्र
पूर्वी म्हणे आपल्याकडे चार-चार पाच-पाच दिवस लग्न चालायची.  सगळे नातेवाईक, इष्टमित्र, शेजारी-पाजारी सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊन याच चार पाच दिवसांत आपापल्या नात्यांची वीण घट्ट करायचे. आजकाल काही तासांत सगळं आटोपलं की सगळे आपापल्या मनाची कवाडं बंद करून फुर्सत नाहीचा जप करायला मोकळे.
ह्याच्याशी असहमत.
मधल्या काळात लग्नं झटपट आटोपली जायची पण हल्लीही लग्नं चार-चार दिवस चालतात.  ग्रहमख, बांगड्या भरणे, मेंदी लावणे, उत्तर भारताच्या प्रभावामुळे एक दिवस संगीत,  मग प्रत्यक्ष लग्न, त्यानंतर सत्यनारायण असे चांगले चार/पाच दिवस कार्यक्रम असतात आणि स्थानिक आप्तस्वकीय, विशेषतः महिला वर्ग सर्वात सहभागी होताना दिसतो.
हल्ली एकूणच लोकांची उत्सवप्रियता वाढलेली आहे. काही तरी कारण काढून स्नेहसंमेलने ( get togethers)  आयोजित करण्याचे प्रमाण खूप दिसते.  अर्थात त्यात खाणे-पिणे, भेटवस्तू देणे ह्याला अधिक महत्त्व दिले जाते.  जिव्हाळा  जपण्याबद्दल मात्र बहुतेक वेळा उदासीनता आढळते.