शाब्दबंधावर अर्थ कशा पद्धतीने दिले आहेत, ते समजले नाही. शिक्षण म्हणजे अध्यापन दिला आहे, पण अध्ययन दिलेला नाही. शिक्षण देणे आणि शिक्षण घेणे यांतील फरक स्पष्ट करायला हवा होता. तसेच, शिक्षण मिळणे आणि मिळवणे(प्राप्त होणे आणि प्राप्त करणे) हेही प्रयोग सांगायला हवे होते. साध्या शब्दकोशात हे सर्व असते.
शिवाय, विद्याभ्यास हा शब्द चुकीचा लिहिला गेला आहे. शाब्दबंधाला सुधारणा करण्यास भरपूर वाव आहे.
आता शिक्षण आणि प्रशिक्षण यांमधील फरक. शिक्षण म्हणजे न येणारी गोष्ट आत्मसात करणे. प्रशिक्षण म्हणजे समग्र शिक्षणापैकी एखाद्या लहानशा हिश्श्याचे प्रगत (बहुधा व्यावहारिक, व्यवहारात वापरण्यासाठी, प्रत्यक्ष कामात उपयोग करण्यासाठी वगैरे,) ज्ञान करून घेणे/देणे.