अमोल पालेकर आणि राहूल सोलापूरकरांची भूमिका असलेले 'काळा वजीर पांढरा राजा' हे नाटक जवळ जवळ वीस वर्षांपूर्वी पाहिलेले होते. त्यात असा एक प्रसंग आहे.

शहरात गुंडगिरी करत फिरणारा एकजण (नाटकात राहूल सोलापूरकर? ) तुरुंगात असतो. त्याला भेटायला त्याची आई त्याच्या आवडीचे 'तिसऱ्याचे कालवण' डब्यात घेऊन येते आणि म्हणते. "खाऊन घे. बाकी सदा गावभर तुझी दगदग चालू असते, जरा तुरुंगातच तुला थोडी उसंत मिळेल असे दिसते!"

मला फारा वर्षांनी असा प्रसंगाधिष्ठित विनोद ऐकायला मिळाला होता.

तपशीलाबाबत चू. भू. द्या. घ्या.