थोडक्यात सांगायचे म्हणजे-
शिक्षण : फक्त पुस्तकी ज्ञान संपादन करणे. (उदा. अभियांत्रिकी शिक्षण म्हणजे नुसतेच परीक्षेत पार होउन पदवी मिळवणे).
प्रशिक्षण : प्रत्यक्ष व्यवहारात तेच शिक्षण उपयोगात आणण्यासाठी लागणारे कसब अंगी बाणवणे. (उपरोक्त उदाहरणा बाबत - त्याच पदवीधराने एखाद्या कारखान्यात प्रत्यक्ष यंत्रे व सयंत्रे वापरताना ते पुस्तकी ज्ञान उपयोगात आणण्यासाठी निष्णात व अनुभवी अभियंत्याच्या देखरेखित 'व्यवहारोपयोगी ज्ञान' प्राप्त करणे).
म्हणजेच नुसते शिक्षण 'उपयोगाचे' नाहि, तर प्रशिक्षण घेणे हेच खरे महत्त्वाचे आहे. नाहितर त्या शिक्षणाचा 'उपयोग' शुन्य ठरू शकतो.
तसेच शिक्षणाशिवाय प्रशिक्षण घेणे तितकेसे प्रभावी ठरत नाही (काही अपवाद वगळता!)