माझे मत असे आहे की, गोष्टींचा पारंपरिक प्रवास बदलू नये. कारण लहान मुलांच्या कल्पना शक्तीचा विकास घडवायला त्या परिकथा, जादुच्या कथा वगैरे ह्व्यातच. तसेच हल्ली उपलब्ध असलेल्या द्रुक् श्राव्य तबकड्या (विडिओ सिडीज् ) पहायला देणे हे देखिल काही अंशी चुकच. त्याचे असे आहे, कि आपण रंगवून रंगवून सांगितलेली ससा कासवाच्या शर्यतीची गोष्ट ऐकताना लहान मुल त्याच्या कल्पना शक्तीने ते चित्र डोळ्यासमोर उभे करण्याचा प्रयत्न कर असते. त्यातुनच त्याच्या कल्पना शक्तीचा अधिक विकास होत असतो.. ऐकून एखादी गोष्ट डोळ्यासमोर आणण्याची आणि 'ऐकलेल्या' गोष्टीचे 'आकलन' होण्याची क्षमता वाढते. तज्ञ काय म्हणतात कुणास ठाउक, पण माझे हे वैयक्तिक मत आहे.
सुरुवातीला छोट्या गोष्टी सांगणे, त्यात रस वाटू लागल्यावर ईसापनितितल्या बोधप्रद गोष्टी सांगणे यातून मुलांना एका जागी बसुन लक्ष केंद्रित करणे, कुणाचे तरी 'ऐकणे' याची सवय लागते. त्यांच्यात 'शांत' राहणे या गुणाची वाढ होते. शिवाय गोष्टींच्या आधाराने पुढे पुढे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मुलांच्या गळी उतरवायला मदत पण होते! त्यासाठीच बऱ्याच 'बोधप्रद गोष्टी' तयार झाल्यात आणि त्यात भर पडतच असते.
परिकथा , जादुच्या कथा, ईसापनितितल्या कथा, वगैरे टप्प्या टप्प्याने हा प्रवास घडणे हेच बरोबर आहे. तत्त्वतः ज्यांना असे वाटते कि मुलांना काल्पनीक गोष्टी सांगुच नयेत, वास्तव काय असेल ते सांगावे - ते सगळे लोक नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका वगैरे काही बघतच नसतील असे मानायला हवे! तसेच त्यांनी मुलांना कार्टुन्स बघायला सुद्धा देता कामा नयेत, कारण ते सगळे विश्वच 'काल्पनिक' असते!
सबब, हे सर्व थोतांड आहे, इतके काटेकोरपणे मुलांशी कुणी वागू शकेल काय?!