लेख आवडला.
-----------
काळाची पावलं ओळखावी म्हणतात. काळाच्या पडद्या आड अनेक गोष्टी हरवल्यात. 'कालाय तस्मै नमः' म्हणत आपण हे हरवणं मान्य केलं.
असे नाहीच.. काळाबरोबर बदलतय सारे जग.. कदाचीत माणुस पण त्या काळाबरोबर धावतोय, पण त्याचे मन तेच आहे.. अजुनही आपले काही हरवलय असे त्या मनाला वाटतच नाहि.. मन केंव्हाही उठते आणि कुठल्याही झोक्यावर अगदी मनसोक्त झोके घेत राहते... हळुच अंगणातल्या रांगोळीवरती ताईच्या नकळत एक रेघोटी मारून येते.. गच्चीवरल्या पत्त्यांमध्ये भज्याचा अस्वाद घेवून येते.. आईच्या नकळत बाहेर बर्फाचा गोळा खावून येते.. हे मन तर आपलेच आहे ना.
माणसाने पण आपल्या या मनावर प्रेम करावे, त्याप्रमाणे जगावे.. मग हरवल काही म्हणण्यापेक्षा ही बरेच काही गवसल आहे असेच आपण म्हणू.. म्हणून वाटते माणसाने अगदी असेच मनाप्रमाणे मुक्त.. स्वैर.. स्वछंदी पणाने जगावे.
-- शब्दमेघ.. एक मुक्त.. स्वैर..स्वछंदी जीवन