कशेळीचा श्री कनकादित्य हा लेख छानच आहे. त्या वरील प्रतिक्रियेत विचारलेल्या शंकेविषयी. भारतीय मूर्तिशास्त्रानुसार देवतेच्या महिरपीत कीर्तिमुख कोरण्याची प्राचीन प्रथा आहे. कीर्तिमुख ही एका राक्षसाशी संबंधित संकल्पना! या राक्षसाला म्हणे 'न शमणारी' भूक लागायची. त्याला ब्रह्मदेवाने लोकांची पापे खाण्याचे काम दिले. आणि त्याची नेमणूक मंदिरात केली. अहर्निश पापे करण्यात मग्न असलेल्या माणसांना केवढा दिलासा? कीर्तिमुखाची भूक शमत नाही आणि माणसांची पापे करणेही थांबत नाही. त्यामुळे दोघांचे चांगलेच फावले. तुम्ही पापे करा मी ती खातो. ओळखीचे वाटते का हे धोरण?