लेख आवडला. आपण योग्य प्रश्न उपस्थित केला आहे. अभ्यास म्हणजे नक्की काय , हे कुणालाच शालेय जीवनात कळत नाही. पण एखाद 
लिखाण (आवडीचे असो वा नसो. बहुतेक वेळेला, न आवडणारेच) पुन्हा पुन्हा वाचणं , म्हणजे अभ्यास, असं मोठं झाल्यावर , थोडी पुढची 
पण नक्की नाही , अशी व्याख्या कळली. शाळेत असताना चांगल्या चांगल्या (म्हणजे रहस्यकथा, शृंगार कथा, वगैरे) कादंबऱ्या अथवा कथा 
अभ्यासाला का ठेवत नाहीत असं नेहेमी वाटायचं. एक गृहस्थ तर मला म्हणाले, मुलांचं शाळेत जाण्याचं वय बारा वर्षांचं करावं, कारण 
तो पर्यंत मुलांचं खेळण्याचं वय असतं. म्हणजे त्यांना बरेच विषय सहज समजतील. त्यांना घरीच बरेचसे ज्ञान द्यावे, जे व्याहारिक नक्कीच 
असेल. म्हणजे आधी इंटर्न्शिप, मग मेन कोर्स, असं मी त्यांना विचारलं. तर ते रागावून म्हणाले , पटत नसेल तर ऐकू नका , पण नाव ठेऊ 
नका. आता त्यांच म्हणणं कधी कधी पटतं. हल्ली अडीच तीन वर्षापासून शाळाप्रवेश चालू होतो. झोपेचं खोबरं करून , प्रातर्विधी न उरकता 
बाळ शाळेत जाणाऱ्या रिक्षेवाल्या काकांच्या ताब्यात दिला जातो. मग त्याची इतरांशी तुलना, अभ्यासाबद्दल बोल्णं , त्यानी मोठं झाल्यावर काय 
करायचं हे ठरवणं, वगैरे चालू होतं. आपण किती "फिक्सिंग " करतो हे आपल्यालाच कळत नाही. असो. प्रतिसाद मोठा झाल्याबद्दल , क्षमस्व. 
पण विषय असा आहे की लिहावं असं वाटलं. चांगला लेख. पु. ले. शु.