>>शिक्षण या क्षेत्रात काम करताना प्रत्येक शिक्षकाला प्रथम शिक्षण म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर माहीत असायला हवे. मात्र बऱ्याचदा याचे उत्तर त्यांच्याकडून मिळत नाही.<< या प्रश्नाचे उत्तर जर शिक्षकांना देता येत नसेल तर काय हमालाला, बँक कारकुनाला की उद्योजकाला देता येईल? या लोकांपेक्षा शिक्षणक्षेत्रातला शिक्षक नक्कीच जास्त शहाणा असेल.  उगीच सरकारच्या शिक्षणखात्याची नालायकी शिक्षकांवर लादू नये. आज महाराष्ट्रातले शिक्षणखाते आधी चुकीचे प्रयोग करून,  नंतर ते मागे घेऊन,  पुन्हा नवीन प्रयोगाचे घाट घालून ,अंती शिक्षणाचा बट्ट्याबोळ करत आहे, तसे भारतातीलच काय, पण जगातल्या कोणत्याही प्रदेशात होत नसेल.