अभियांत्रिकीचा विद्यार्थी निव्वळ पुस्तकी शिक्षण घेत नाही. त्याला शिक्षणादरम्यान प्रात्यक्षिके करावी लागतात. कॉलेजमधून बाहेर पडल्यावर तो  लगेच इमारत किंवा पूल बांधू शकतो, किंवा यंत्रसामग्रीमधले दोष शोधू शकतो.  डॉक्टर थेट दवाखाना थाटू शकतो व शस्त्रक्रिया करू शकतो,  आणि आयटीवाला संगणकावर कामे करू शकतो.  प्रशिक्षण हे त्या क्षेत्रातल्या एखाद्या  छोट्याशा  हिश्श्याकरता लागणारे विशेष शिक्षण असते. वैद्यकीय उपचारासाठी किंवा वैद्यकीय तपासणीसाठी एखादे नवीन तंत्र जेव्हा शोधले जाते, तेव्हा त्या तंत्राची माहिती करून घेऊन ते वापरात आणण्यासाठी  प्रशिक्षण लागते.