मला शिक्षकांना नावे ठेवायची नाहीत ,ना शासनाला, पण शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असतो. असा सुविचार वाचनात आहे . त्याच बरोबर तिसरा डोळा हि संकल्पना शिव म्हणजे शंकराच्या बाबतीत वापरली जाते . पुढे असेही म्हटले जाते की जर शिवाने हा तिसरा डोळा उघडला तर सृष्टी नष्ट होईल. पण हा शिव आपला तिसरा डोळा अन्याया विरुद्ध लढण्यासाठी उघडतो. हिच संकल्पना जर शिक्षक वा शिक्षण या बाबतीत विचारात घेतली तर माणसाला हा तिसरा डोळा (ज्ञानरुपी) उघडण्याचा अधिकार आहे का ? की, अशा आख्यायिका सांगून या पासून परावृत करण्याचा प्रयत्न करतात. जर शिक्षकाला शिक्षण म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर नक्की माणसातील हा ज्ञानरुपी डोळा उघडेल व त्यांच्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाला संपवेल .
                                              विचारांची देवाण-घेवाण अशीच चालू राहू द्या माझ्या लेखनाचा मुख्यहेतू हा आहे की समाजातील अज्ञान दुर व्हावे व हा देश अजुनही स्वदेशीयांच्या गुलामगिरीत भरडला जातोय तो मुक्त व्हावा . आपल्या देशाला उत्तम विचारांच्या माणसांची गरज आहेच पण त्या विचारा वर अंमल करणारांची सुद्धा. 
 आपला अमुल्य वेळ प्रतिक्रिये साठी दिल्याबद्दल आभारी आहे.